तुमच्या आधार कार्डद्वारे घरबसल्या ‘असे’ काढा पॅन कार्ड!

नवी दिल्ली – आजच्या या डिजिटल युगामध्ये पॅन कार्ड असणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक ठरतंय. प्राप्ती कर भरण्यापासून ते विविध कार्यालयीन उपयोगांसाठी पॅन कार्ड अत्यंत महत्वाचे आहे. पॅन कार्डचे हेच महत्व लक्षात घेता आता अनेक लोक आर्थिक व्यवहारांसाठी महत्वाचे असलेले पॅन कार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर काढताना दिसतात.

हे लक्षात घेता आता प्राप्ती कर विभागातर्फे पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया सुलभ व जलद गतीने व्हावी यासाठी आधार कार्ड आधारित पॅन कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

असे काढा पॅन कार्ड

१) https://www.Incometaxindiaefiling.Gov.In या संकेतस्थळाला भेट द्या.

२) या संकेतस्थळावर डाव्या बाजूस ‘क्विक लिंक’ असा पर्याय दिसेल.

३) क्विक लिंक्स पर्यायाखाली ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ हा पर्याय दिसेल. येथे क्लिक करावे.

४) वरील पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘गेट पॅन’ व ‘चेक स्टेटस/ डाउनलोड पॅन असे दोन पर्याय दिसतील’. यातील पहिला पर्याय हा नवे पॅन कार्ड काढण्यासाठीच आहे. त्यामुळे पहिल्या पर्यायावर क्लिक करावे.

५) यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. यामध्ये मोबाईल क्रमांकाशी जोडलेला आधार क्रमांक भरावा.

६) आधार क्रमांक भरल्यानंतर पुढे तुमच्या आधारशी जोडलेल्या क्रमांकावर एक ओटीपी क्रमांक येईल. तो भरून घ्यावा.

७) ओटीपी भरल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्डवर भरलेली माहिती येईल. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

८) माहिती बरोबर असल्याचे आढळल्यास पुढे जाण्याचा पर्याय निवडावा. येथे आधारही जोडलेला ईमेल आयडी व्हॅलिडेट करून घ्यावा. इमेल आयडी व्हॅलिडेट करणे ऐच्छिक आहे.

९) तुम्ही ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ई पॅन कार्ड मिळेल. तसेच पॅन कार्डसाठीची ठरलेली रक्कम ऑनलाईन भरल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरील पत्त्यावर तुमचे पॅन कार्डही पाठवले जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.