‘लेह-लडाख’मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

रिश्टर स्केलवर 5.4 नोंदली तीव्रता

नवी दिल्ली – ‘लेह-लडाख’मध्ये शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.4 एवढी नोंदवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 10 सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते घराबाहेर पडले.

दरम्यान, याच महिन्यात 8 सप्टेंबरला लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 4.4 होती. यापूर्वी 31 ऑगस्टला लेह-लडाखमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी भूंकपाची तीव्रता 4.3 नोंदली गेली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.