पदाधिकाऱ्यांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

-“त्या’ पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे तक्रार करणार
-बापूराव सोलनकर यांची माहिती

दौंड – आमच्या पक्षातील काही पदाधिकारी “आम्ही जुने पदाधिकारी आहोत’, असे भासवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड तालुका पक्ष निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी दिली. सोलनकर म्हणाले की, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष स्थापनेपासूनचा कार्यकर्ता होतो. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. मी अनेकांना पक्षांमध्ये मोठमोठी पदे दिली होती. रासपच्या पदाधिकाऱ्यांशी माझे मैत्रीचे संबंध आहेत; पण लोकसभा निवडणुकीवेळी मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 31 बूथवर रासपला आघाडी होती.

यावेळी मात्र, बारामती तालुक्‍यातील 3 बूथ सोडले तर एकाही बुथवर भाजपला आघाडी मिळाली नाही. निवडणुकीमध्ये केलेल्या प्रभावी कामावर विश्‍वास ठेवून, पवार यांनी दौंड तालुका निरीक्षकपदी माझी निवड केली. सोलनकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मला खूप सन्मान दिला आहे. चहा राष्ट्रवादीचा आणि जेवणही रासपचे, असा गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये पसरविला जात आहे. हा गैरसमज चुकीचा आहे.

आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने दौंड विधानसभा जिंकायचीच, असा निर्धार केला आहे. त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. आमच्यातील शहरातील काही पदाधिकारी कधीही बैठकीत उपस्थित राहत नाहीत; पण आम्ही जुने पदाधिकारी आहोत, असे भासवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांशी संगनमत करून मीडियाच्या माध्यमातून वक्‍तव्य करीत आहेत. अशा पदाधिकाऱ्यांकडे तक्रार अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे बापूराव सोलनकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)