पुणे – मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांना माहिती देत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना एक चिठ्ठी दिल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, “मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. कारण मला वाटतं की त्यांच्यामागे मोठं षडयंत्र सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठी पाठवणे यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नवीन आलेलं सरकार कन्फ्युज्ड आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी चार अशा गोष्टी दाखवल्या ज्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना दिसत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. मला आठवतंय अनेक आमदार असे होते ते बोलत होते दादांनी फंड दिला नाही, म्हणून आम्ही वेगळा गट करतोय.
शिंदे मंत्रिमंडळात मनसेचा समावेश? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी राज ठाकरेंची घेतली भेट
महाराष्ट्रातील एक स्वाभिमानी महिला म्हणून मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही निधी मिळत नाही, शिवसेने हिंदुत्त्व सोडलं असं सांगत वेगळा गट केला. मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? या राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा मुख्यमंत्री असतो. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहिली. दिल्लीपुढे हा महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही. सातत्याने टीव्हीवर दिसतं तर यांना कशा वेदना होत नाहीत. त्यांना छत्रपतींचा नाव घेण्याचा अधिकारच नाही.
“बुलेट ट्रेन करा मात्र त्याआधी मुंबईची….”; सुप्रिया सुळेंची मोदी सरकारकडे मागणी