श्रीनगर : काश्मिरातील उधमपूूर जिल्ह्यात लष्कराच्या जवानाने छावणीत स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
प्रिन्स कुमार (वय 25) असे या जवानाचे नाव आहे. ते पंजाबमधील होशियारपूर गावचे रहिवासी आहेत. त्यांची लष्कराच्या 112 टेरीटोरीयल आर्मीत नियुक्ती होती. रेहमबल भागातील चिनार छावणीत जा जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेतली.
या जवानानच्या आत्महत्येचे कारण तातडीने समजू शकले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर सोपस्कर पूर्ण केल्यानंतर जवानांचा मृतदेह युनिटच्या हवाली करण्यात आला, असे सांगण्यात आले.