नवी दिल्ली: तात्काळ आणि तिहेरी तलाक पद्धतीला बेकायदेशीर ठरवणाऱ्या ऐतिहासिक विधेयकाला आज राज्यसभेने मंजूरी दिली. 99 विरुद्ध 84 मतांनी विधेयक मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले व्यक्त केले आहे. ‘एक पुरातन आणि मध्ययुगीन प्रथा शेवटी इतिहासाच्या कचरापेटीत टाकली गेली. मुस्लिम महिलांबाबतची ऐतिहासिक चूक आज संसदेत दुरुस्त केली गेली. हा लैंगिक न्यायाचा विजय आहे, यामुळे समाजात समता आणखी वाढेल’. असं मोदींनी म्हंटल आहे.