नगर: पारनेर तालुक्यातील वासुंदे-टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीन कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये डंपरसह 10 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी (दि.7) रोजी रात्री 8 वाजेदरम्यान पारनेर तालुक्यातील वासुंदे-टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना समजली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून डंपर (क्र. एम.एच. 48 जे 410) ताब्यात घेतले असून सोमनाथ भाऊ भाईक (वय-27 रा.कातळवेढा ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकून 10 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक फौजदार रोकडे करत आहे.