Actor Karan Vohra | अनेकदा मालिका, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात घडतात. असाच एक प्रकार टीव्ही मालिकेच्या सेटवर घडला आहे. ‘नाम नमक निशान’ या मालिकेचे शूट सुरू असताना आगीचा भडका उडला. ज्यातून अभिनेता करण वोहरा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अमेझॉन मिनी टीव्हीवरील शो ‘नाम नमक निशान’चे शूट सुरु होते. यावेळी करण वोहराचा गार्डन एरियामध्ये फायर ओव्हनचं झाकण उघडण्याचा सीन होता. त्याने झाकण उघडताच आगीचा भडका त्याच्या अंगावरच आला. त्याच्या चेहऱ्यावरही भडका उडाला. ज्यानंतर त्याचा सहकलाकार वरुण सूद धावत त्याच्याजवळ गेला. यात तो किरकोळ जखमा झाला आहे. Actor Karan Vohra |
View this post on Instagram
करणने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘कसा तरी वाचलो. वरुण फक्त तूच ही घटना डोळ्यांनी पाहिलीस.’ वरुण सूदनेही कमेंट करत लिहिले, ‘हे खूपच भयानक होतं. तू चॅम्पियन सारखं हे सांभाळून घेतलं’. करण या अपघातातून थोडक्यात वाचला आहे. यानंतर त्याच्या तब्येतीची अनेकांकडून विचारपूस केली जात आहे. Actor Karan Vohra |
दरम्यान, करण वोहराने जिंदगी की मेहक, मैं हूं साथ तेरे, कृष्णा चली लंडन, पिंजरे खुबसुरती यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. ‘इमली’ या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.
हेही वाचा:
“राज्यात ठाकरे-२ सरकार येणार”; संजय राऊतांचा मोठा दावा