रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) – रांजणगाव गणपती येथील एका ८३ वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेवार यांनी दिली.
डॉक्टर स्नेहल घोडेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर रुग्णाचा तपासणीसाठी दिलेला अहवाल पाँझिटीव्ह आला असता त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र, कोणत्याही खाजगी रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून येथे दाखल व्हावे लागले. माञ त्यांना आधीच शारिरीक व्याधी असल्याने उपचारादरम्यान निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बांधितांची संख्या वाढत असुन ही प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. त्याच बरोबर नागरिकांकडून ही शासनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.