पवनानगर – मावळ तालुक्यातील बेडसे गावाशेजारील लेणीच्या पायथ्याशी आढळलेल्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या साधारणता 11 ते 12 फुटाच्या अजगराला वन्यजीव रक्षक मावळ टीमच्या सदस्यांनी सुरक्षित पकडले.
पवन मावळातील बेडसे गावाच्या लेणीच्या पायथ्याशी स्थानिक तरुणांनी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अजगर पाहिले. पाहिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळवले. त्यानंतर वन्यजीव रक्षक टीमचे अनिल आंद्रे, ऋषिकेश सातकर, नितीन चौधरी, सोमनाथ चौधरी, संतोष सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.
वन्यजीवरक्षक टीमच्या सदस्यांनी वनखात्यास कळवून व घटनास्थळी पोहचून अजगारास सुरक्षितपणे पकडले. अजगरावर प्राथमिक उपचार करून जंगलमध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून देणार असल्याचे प्राणीमित्र अनिल आंद्रे यांनी सांगितले.