ऍक्ट्रेस अमायरा दस्तूरकडे सध्या बॉलिवूडमधील 4 सिनेमे आहेत. त्याशिवाय तिच्याकडे दक्षिणकडील 2 सिनेमांचे प्रोजेक्टही आहेत. हे सगळे सिनेमे याच वर्षभरात रिलीज होणार आहेत. राजकुमार राव आणि कंगणा रणवतच्या “मेंटल है क्या’च्या बरोबरीने अमायराचे तीन अन्य सिनेमे एकापाठोपाठ एक रिलीज होणार आहेत. त्यामध्ये “मेड इन चायना’, “प्रस्थानम’ आणि “कोई जाना नही’हे सिनेमे आहेत. तिच्याकडे एवढे मोठे प्रोजेक्ट असूनही अमायरा अजूनही समाधानी नाही. नवीन काही तरी शिकून स्वतःची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवण्यासाठी ती धडपडते आहे.
एका आगामी तमिळ सिनेमासाठी ती अमायराने तमिळ शिकण्याचे ठरवले आहे. ती सध्या तमिळची ट्युशन घेते आहे. डबिंगच्यावेळी कोणतीही अडाण येऊ नये म्हणून तिला तमिळ् शिकायचे आहे. हा सिनेमा प्रभुदेवाबरोबरचा असून एक सायकोलॉजिकल थ्रिलर असणार आहे. अमायराने आपल्या भूमिकेसाठी आवश्यक असे भरपूर वाचनही करायला सुरुवात केली आहे. तिने धनुषबरोबर 2015 मध्ये “एनेगन’मधून तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. आता तिला प्रेक्षकांबरोबर विश्लेषकांनाही प्रभावित करायचे आहे. त्यासाठीच हा अट्टहास सुरू आहे.