बिकिनी घालून गोल्फ खेळतेय ऍमी जॅक्‍सन

ऍमी जॅक्‍सनने काही दिवसांपूर्वीच आपल्या “गुड न्यूज’ची घोषणा केली होती. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत खूप खुषीत आहे. आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तिने फॅन्सपर्यंत आपल्या आरोग्याचे अपडेट पोहोचवायला सुरुवात केली आहे. असाच एक मस्त व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती बिकीनी घालून गोल्फ खेळताना दिसते आहे. बिकिनीवर तिने व्हाईट किमोनो घातला आहे. त्या अवतारात ती एकदम हॉट दिसते आहे. प्रेग्नन्सीमधील व्यायाम म्हणून तिला डॉक्‍टरांनीच गोल्फ खेळायला सांगितले असावे. तिच्या बाळाचा जन्म व्हायला अजून बराच अवकाश आहे. पण त्याच पूर्वी ग्रीसमध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडबरोबर विवाहबद्ध होणार आहे. काही महिन्यांपूर्वी ती रजनीकांत आणि अक्षय कुमारबरोबर “2.0’मध्ये दिसली होती. तेंव्हापासून ती जी गायब झाली होती, ते अगदी “गुड न्यूज’ची घोषणा करेपर्यंत ती कुठे आहे, काय करते आहे याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हती. आता मात्र फॅन्सशी कनेक्‍टेड राहण्यासाठी तिने नियमितपणे स्वतःचे अपडेट इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.