अमृता खानविलकरने ट्विट केलेला ‘बाला चॅलेंजचा’ हा ‘व्हिडिओ’ पाहिला का ?

मुंबई – अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपटा ‘हाऊसफुल 4’ मधील ‘बाला’ हे गाण सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाल आहे. अक्षयने याच गाण्यावर त्याच्या फॅन्सला आणि बॉलिवूड कलाकारांना थिरकण्यास सांगितले आहे. त्याने दिलेला हा ‘बाला चॅलेंज’ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अक्षयने दिलेले हे आव्हान वरुन धवन, रणवीर सिंग, करिना कपूर, अर्जून कपूर, कियारा अडवाणी यांसारख्या अनेक कलाकारांनी स्विकारले असुन ते बाला डान्स करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री अमृता खानविलकरनेही तिच्या घरातील सुपर क्युट डान्सरचा व्हिडिओ शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये अमृताच्या घरातील एक चिमुकला सदस्य अक्षय कुमारच्या गाण्यावर बाला नृत्य करताना दिसत आहे. “आमच्या घरातील या क्युट बाला डान्सरला एकदा पाहाच, त्याच्या डान्स स्टेप पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.” असे कॅप्शन लिहित तिने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने अक्षय कुमार आणि रितेश देशमुखला टॅग केलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)