वाघोली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे वाघोली मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाघोली येथे भाजप तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुस्तके, मूर्ती, बुके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा भाजपचे युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी सांगितले की, काही आठवड्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे आगमन हवेली तालुक्यात झाले होते, त्याच पद्धतीने गोरगरीब मुलांना भेटण्यासाठी एका शाळेत अमृता फडणवीस आल्या होत्या. भाजप पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी फडणवीस कुटुंबीय काम करत आहे. त्यांना भेटणे हा कार्यकर्त्यांसाठी एक सन्मान आहे.
काम करण्याची ऊर्जा फडणवीस कुटुंबीयांकडून मिळत असल्याने वाघोलीत मोठ्या उत्साहात अमृता फडणवीस, शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप नेते गणेश कुटे, रत्नमाला संदीप सातव, केतन जाधव, विजय जाचक, दादा सातव,आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.