मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमृता यांचं ‘डाव’ चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाॅंच झालं आहे.
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. मंदार चोळकर यांनी हे गाणं लिहिलं असून जीत गांगुली यांचं संगित आहे. कनिष्क वर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दशन केले आहे.
सागरिका घाटगेचा हा दुसरा चित्रपट असून याआधी सागरिकाने प्रेमाची गोष्ट या चित्रपटात काम केलं आहे. अमृता फडणवीस यांचं याआधी ‘हॅलो’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर त्यांनी या गाण्याचा व्हीडिओ शेअर केला होता.
अमृता फडणवीस यांचं ‘अंधार’ हे गाणं 6 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून गेल्या 24 तासात 3 लाखाहून अधिक जणांनी हे गाणं पाहिलं आहे.