मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपमधून नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांनी हिंदीतून शेर लिहीत नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सूर्याची उपमा दिली. यासोबत त्यांनी मोदींनी केलेल्या विकास कामांचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले!”
याआधी नितीन गडकरी यांनी देखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावर टीका केली होती. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली होती.
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !
पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में,
खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! #ModiHaiToMumkinHai #modiJiJiyoHazaroSaal @narendramodi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/y4JLNyrmho— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 18, 2022
पटोले म्हणाले होती की, मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही.’’ असं आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्ह्ड्यातील झाला आहे.