मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त अमृता यांचे नवे गाणे लॉंच करण्यात आले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत.
Wishing you a very happy #WomensDay #WomensDay2020 ! Enjoy this spirited day with my song dedicated to acid attack victors … a song of inspiration …. a song of life …. Watch full song on ? https://t.co/KSXITfqAhR @TSeries pic.twitter.com/SwlOh4Tpzj
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 8, 2020
अभिनेत्री डोनल बिश्तने या गाण्यात काम केलं असून अॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच या गाण्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.