अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला; म्हणाल्या, ‘नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण…’

मुंबई – शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. एकेकाळचे संख्ये मित्र असलेल्या शिवसेना भाजपचे नेते आता एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. राजकारणापासून अलिप्त असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या राजकीय युद्धामध्ये उडी घेतल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळालं आहे. अशातच आज अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लागवल्याने राजीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमृता फडणवीस यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून जागतिक पुरुष दिवस व जागतिकी सौचालाय दिनानिमित्ताने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असं आवाहन करत संजय राऊत यांना लक्ष्य केलंय.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर खात्यावर दिलेल्या संदेशात, “आज जागतिक पुरुष दिन व जागतिक सौचालय दिवस आहे. यानिमित्ताने एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी,” असा निशाणा साधला आहे.


काय आहे नॉटी प्रकरण?

अमृता फडणवीस यांच्या ट्विटमधील नॉटी हा शब्द संजय राऊत यांना उद्देशून लिहलेला असून याचा संबंध राऊत यांनी कंगनाबाबत बोलताना केलेल्या एका वक्तव्याशी आहे. राऊत यांनी कंगनाची उल्लेख ‘हरामखोर’ असा केला होता. यानंतर मोठे वादंग निर्माण झाल्याने त्यांनी हरामखोर शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ असा होतो असं स्पष्टीकरण दिलं होत.   

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.