ही गायिका लोकांना का छळतीये?

मुंबई- ‘हिला नको गाऊ द्या…’, असं म्हणत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. अमृता फडणवीय यांनी नुकतंच त्याचं नवं गाणं प्रदर्शित केलं होतं. त्या गाण्यावर त्यांनी ही टीका केली आहे.

टिळेकरांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहित अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला आणि टी सीरिजलाही धारेवर धरलं आहे. अनेक चांगल्या आवाजाच्या गायकांना पुढं येण्यासाठी संधी मिळत नाहीत. त्यामुळं जर फडणवीसांकडे अतिरिक्त पैसा असेल तर, त्यांनी नवोदीत गायकांना चांगल्या संगीत शिक्षणाची संधी द्यावी ही बाबही त्यांनी मांडली. असं करत असताना अमृता यांनी स्वत: मात्र गाऊ नये अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं की कायम त्यावर लोक ट्रोलींग सुरु करतात. अनेकांना तर नवं कामच मिळतं. मात्र या गा्ण्यावर खोचक टीका पहिल्यांदा करण्यात आली आहे.

‘सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.

हिला नको गाऊ द्या
चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी…

Posted by Mahesh Tilekar on Monday, November 16, 2020

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.