अमृताजी, बदललीय ती फक्त तुमची दृष्टी- रुपाली चाकणकर

पुणे: अमृताजी, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हेच पोलीस बांधव सेवा देत होते आणि आजही तेच सेवा बजावत आहेत. पोलीस बांधव तेच आहेत, ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे बदललीय ती फक्त तुमची दृष्टी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना लगावला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही वर्षा बंगला सोडतानाही पाहीला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पोलीस बांधवांवर आपण अविश्वास दाखवत आहात त्यांनी बाॅम्बस्फोट, पूर, २६/११ हल्ला आणि आत्ताच्या कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे.

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, मला वाटते मुंबईने मानवता गमावली आहे आणि निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित नाही, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.