फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका; अमृता वहिनींकडून पुन्हा शिवसेनेवर हल्ला

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या ट्‌विटर हल्ल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. उद्धव ठाकरे, लोकांना मारून तुम्ही नेतृत्व करू शकत नाही, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या कि, उद्धव ठाकरे, लोकांना मारून तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. तो हल्ला आहे, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे, असे  म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला उत्तर दिले आहे.

दरम्यान, याआधीही राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत जे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकात्मक ट्‌विट केले होते. राहुल गांधी हे सावरकरांची कणभरही बरोबर करू शकत नसल्याचे ते म्हणाले होते. हाच धागा कायम ठेवूना अमृता फडणवीस यांनी रविवारी केलेल्या ट्‌विटमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. “केवळ ठाकरे नाव लावल्यामुळे कोणीही ठाकरे होऊ शकत नाही.’ असे त्या म्हणाल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.