मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेकदा त्यांच्या गाण्यावरून ट्रोल केले जाते. त्या सोशल मीडियावर सक्रीय असून अनेक फोटो त्या शेअर करत असतात. नुकतेच 5 जून रोजी झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावरून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.
अमृता फडणवीस यांनी काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडांभोवती उभे असलेले काही फोटो शेअर केले आहेत. “काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणााचे संरक्षण करा!”, असे आवाहन त्यांनी याद्वारे केले आहे. मात्र त्यांच्या या नव्या फोटोशूटवरून त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे.
View this post on Instagram
‘तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात याचे भान ठेवा…” , ‘ही संस्कृती आहे का आपली?’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी मूड बना लिया, वो तेरे प्यार का गम, मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम् अशी गाणी गायली आहेत.