मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर असल्या तरी त्या गायिका म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत. राजकीय विषयांवर टीप्पणी कऱणाऱ्या अमृता फडणवीस सोशल मीडियावर गायणामुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आज आपलं नव गाणं सादर केलं आहे.
“कुणी म्हणालं वेडी, कुणी म्हणालं खुळी”, असं बोल असलेला त्यांचं नवीन गाणं आज आलं आहे. खुद्द अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याला आतापर्यंत हजारहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत.
कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..
हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !
चाल @rohanrohanmusic ,
लिरिक्स @drswapnapatker
हे प्रेरणादायी गीत नक्की ऐका 👉 https://t.co/4kQxWfxYLo @TSeries @shakworld #InternationalWomensDay pic.twitter.com/51hhwQLMq2— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 8, 2021
अमृता यांच्या गाण्याची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. हे गाणं नाट्य संगीतावर आधारित आहे. भावनांच्या या जगतात गडबडले मी गडगडले, असा उल्लेख या गाण्यात आहे. ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये अमृता यांनी या गाण्याला प्रेरणादायी गीत म्हटलं आहे.