युवासेना सचिव वरूण सरदेसाईंची टीका
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे अडनावावरुन टीका केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेने या टीकेचा निषेध केला असून काही शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलनही केले. अशातच आता अमृता फडणवीस यांचे बिग बॉससाठी प्रयत्न सुरु आहेत, असा टोला युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी ट्विटवरुन लगावला आहे.
मराठी बिग बॉस चे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? ‘माजी’ झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल ला उभं पण करणार नाही. बाकी बिग बॉस साठी चालू देत जोरदार.. https://t.co/mSEIPXGUAJ
— Varun Sardesai (@SardesaiVarun) December 22, 2019
राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन खरपूस समाचार घेतला. याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी बिग बॉसचे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? माजी झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉलला उभे पण करणार नाही. बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार, असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे.