मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस लाच प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याला पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या अगोदर त्यांची मुलगी सध्या अनिक्षा जयसिंघानी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच प्रकरणात भाजपाचे मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक सूचक ट्विट केले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मोहित कंबोज यांनी अमृता फडणवीस यांच्या प्रकरणात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अनिल जयसिंघानीला उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन असे म्हटले आहे. त्यासोबतच ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सूचक इशारा दिला आहे.
Uddhav Thackrey Front Man Bookie Anil JaiSinghani Arrested By Mumbai Police !
Ex CP Sanjay Panday and One Ex CP Count Your Days ,U All Will Be Exposed Soon !
जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है,
वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं …..— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 20, 2023
आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात,”उद्धव ठाकरेंचे फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणि एक माजी पोलीस आयुक्त तुम्ही तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. तुमचं सत्यही लवकरच उघडं पडेल. जे लोक दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात, ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यामध्ये पडतात”.असे म्हटले आहे.
दरम्यान, जयसिंघानी गेल्या सात वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर आज त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा हिला पोलिसांनी अटक केली आहे.