हॉलिवुडला मुंबईत आणलं ते अमरीश पुरींनीच

भेदक डोळे, कपाळावर आठ्या, बोलण्यात जरब असे खलनायक म्हणजे अमरीश पुरी यांची आज जयंती. आपल्या अभिनयातून ते प्रेक्षकांमध्ये चीड आणि संताप निर्माण करायचे. वकील, स्मगलर, राजकीय नेता तसेच चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी भूमिका छान वठविल्या तरी ते खलनायक म्हणूनच रसिकांना भावले.

अमरीश पुरी हा एक खलनायकी ब्रँड झाले होते. बॉलिवुड सोडा हॉलिवुडलाही अमरीश पुरींचं आकर्षण होतं. हॉलिवुडला मुंबईत आणलं ते अमरीश पुरी यांनीच. हॉलिवुडचे महान दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांना ‘इण्डियाना जोंस अँड द टेम्पल ऑफ डूम’ या सिनेमात अमरीश पुरी यांना घ्यायचं होतं. त्यामुळे स्क्रीनटेस्टसाठी अमेरिकेला या असं बोलावणं आलं. मात्र अमरीश पुरी यांनी अमेरिकेत जायला नकार दिला. तुम्हाला मी हवा असेल तर इथे भारतात येऊन स्क्रीनटेस्ट घ्या असं उत्तर अमरीश पुरी यांनी स्पिलबर्ग यांना दिलं. स्पिलबर्ग मुंबईत आले. १९८४ साली आलेल्या ‘इण्डियाना जोंस एंड द टेम्पल ऑफ डूम’ या सिनेमातला मोलाराम हॉलिवुडमध्येही गाजला. त्यानंतर त्यांना हॉलिवुडमधून अनेक ऑफर्स आल्या पण त्यांना देश सोडून काम करावंसं वाटलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)