आफ्रिकेच्या फलंदाज प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार

नवी दिल्ली: भारतीय मैदानावर भारतीय गोलंदाजांना विशेषत: फिरकी गोलंदाजांना यशस्वीरित्या सामोरे जाता यावे यासाठी दक्षिण आफ्रिकेने मुंबईचे माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांच्याकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या आफ्रिकेच्या संघास त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

मुजुमदार यांनी प्रथम दर्जाच्या 48.13 च्या सरासरीने 11 हजार 167 धावा केल्या. त्यांनी मुंबईकडून बरीच वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर आसाम व आंध्रप्रदेशकडून स्थानिक सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.

आफ्रिकेच्या संघाबाबत विचारले असता मुजुमदार यांनी सांगितले की, परदेशी संघाचे प्रशिक्षक ही आव्हानात्मक जबाबदारी असणार आहे व ती पार पाडण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. या संघातील बरेचसे वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यामुळे हा संघ मोठ्या बदलातून जात आहे. आफ्रिकेच्या संघास गतवेळी कसोटी मालिकेत तीनही सामने गमवावे लागले होते. हा पराभव त्यांच्यासाठी इतिहासजमा झालेला आहे. आगामी मालिकेतील प्रत्येक सामना हा माझ्यासाठी नवीन सामना असेल असा दृष्टीकोन ठेवीतच मी रणनीती आखणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)