मिटकरींचा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर घणाघात; म्हणाले, ‘शकुनी डाव…’

मुंबई – मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान , महाविकास आघाडीचे नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील. #मोदीहैतोमुमकिनहै” असा विश्वास ठाकरे सरकारकडून वर्तविण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला.

अमोल मिटकरी म्हणाले,’चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजुन घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारिपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्या शिवाय राहणार नाही.’ असं ट्विट करत अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.