मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. त्यामुळे शिवरायांची गाथा सांगणारे अनेक चित्रपट आणि मालिका रुपेरी पडद्यावर प्रसारित होत असतात.
अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका फार गाजली. राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अमोल कोल्हे यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून छत्रपतींच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. नुकतंच अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील आपले काही फोटो शेअर केले आहेत.
अमोल यांना शिवराय साकारून मिळालेली लोकप्रियता आणि लोकाश्रय पाहता मालिकेच्या टीआरपीवर चांगला परिणाम होणार हे नकीच. सोनी मराठीवर वाहिनीवर सध्या स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सोम-शनि, रात्री 8:30 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.