अमोल कोल्हेनी केला फेटा न बांधण्याचा निर्धार

बीड: राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा अंबेजोगाईमध्ये आली असता बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही” असा निर्धार खासदार अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावर केला आहे.

दरम्यान कोल्हे राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी वरील निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा या कोल्हे यांना फेटा बांधण्यासाठी गेल्या असता त्यांना थांबवत “परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही . तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन” असे विधान त्यांनी केल्याने बीड मध्ये एकच चर्चा रंगली आहे.

सध्या परळीमधून महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंढे तर केज मधून संगीत ठोंबरे या आमदार आहेत. दरम्यान पंकजा मुंढे या परळी मतदार संघातून दोन वेळा निवडून आल्या आहेत. २०१९ ला परळी मध्ये मुंढे विरुद्ध मुंढे लढत पाहायला मिळणार असल्याने नेमका निकाल काय लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभेसाठी परळी मतदारसंघात भाजपाच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची लढत त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. पंकजा या २००९ पासून परळी येथे आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणारी लढत अटीतटीची ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)