मुंबई – शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘आपण येत्या १८ डिंबेरला एक मोठी घोषणा करणार आहे’. असं आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून म्हंटल होतं.
दरम्यान, आज (दि. १८) अमोल कोल्हे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोपवे, वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ शंभुसृष्टी निर्मिती करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मती सह रोप-वे निर्मिती करण्यात यावी तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. आज त्यांच्या प्रयत्नांना माननीय प्रहलाद सिंह पटेल पर्यटन व सांस्कृतिक मंत्री भारत सरकार यांनी अमोल कोल्हे यांना लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी केंद्रीय समिती मार्फत सर्व्हे केला जाईल पॉलिसीनुसार त्यांनतर पुढिल भूमिका स्पष्ट केली जाईल. असे अमोल कोल्हेंनी सांगितले.