मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. त्यामुळे शिवरायांची गाथा सांगणारे अनेक चित्रपट आणि मालिका रुपेरी पडद्यावर प्रसारित होत असतात.
अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका फार गाजली. ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील अमोल कोल्हे यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आणि सर्वत्र त्यांच्या कामाचे जोरदार कौतुक देखील झाले.
दरम्यान, आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. सोनी मराठीवर सध्या ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सुरु आहे. या मालिकेद्वारे डॉ. अमोल कोल्हे छत्रपतींच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. अमोल कोल्हे यांना शिवराय साकारून मिळालेली लोकप्रियता आणि लोकाश्रय पाहता मालिकेच्या टीआरपीवर याचा चांगला परिणाम होणार हे नक्की.
View this post on Instagram
नुकतंच, अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील आपला एक फोटो शेअर केले आहेत. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून, सर्वांनाच त्यांचा छत्रपती वेशातील लूक आवडला आहे. सोनी मराठीवर वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सोमवार ते शनिवार ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अनेक चाहत्यांनी अमोल कोल्हे यांना या प्रवासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.