राज्याच्या पर्यटन विकासासाठी भक्ती शक्ती कॉरिडॉर -अमोल कोल्हे

पुणे- महाराष्ट्र राज्याला एक मोठा इतिहास लाभला आहे. हा इतिहास चांगल्या पध्दतीने मांडून तसेच संबंधीत ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणात करता येईल. यासाठी आपण भक्ती-शक्ती कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्‍ट राबविणार असल्याची माहिती
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनानिमीत्त ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे(टॅप) संघटनेने टाफी, ईटा, ताई, स्काल आणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ(एमटीडीसी) यांच्यावतीने एका ऑन लाईन वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये खासदार डॉ.अमोल कोल्हे, पर्यटन विभागाच्या उप संचालक सुप्रिया करमरकर, एमटीओएचे माजी अध्यक्ष सुधीर पाटील, एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक दिपक हारणे, टॅपचे अध्यक्ष डॉ.विश्‍वास केळकर, संचालक दिपक पुजारी, प्रमोद शेवडे, निलेश भंन्साळी आदी सहभागी झाले होते.

डॉ.कोल्हे म्हणाले, राज्यामध्ये अष्टविनायक तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराज यांचे गडकोट अशी अनेक भक्ती व शक्तीपिठे आहेत. तीथे चांगल्या पायाभूत सुविधा दिल्यातर पर्यटनामध्ये आणखी वाढ होईल. याबरोबरच डॅम बॅक वॉटर ब्रेड ऍण्ड ब्रेकफास्ट, एक्‍सपिरियंन्स टुरिझम, स्टे टुरिझम अशा संकल्पना राबवत पर्यटनाला ग्लॅमर प्राप्त करुन दिले पाहिजे. यातून रोजगार निर्मीतीबरोबरच राज्यात आर्थिक सुबत्ता येईल.

सुधीर पाटील म्हणाले, शहरांचेही टुरिझम बोर्ड असतात, तसा पुणे शहराचाही टुरिझम बोर्ड असावा. यासाठी टॅप संघटनेने पुढाकार घ्यावा. त्यांनी शहरातील माहिती नसलेल्या गोष्टी पर्यटकांपुढे आणाव्यात. यासाठी सरकार व संघटना दुवा असतील. सुप्रिया करमरकर म्हणाल्या, पर्यटन क्षेत्र हे असंघटीत क्षेत्र आहे.ते संघटीत करण्याची प्रक्रिया सरकार करत आहे. यासाठी एक धोरणात्मक आराखडा करण्याचे काम सुरु आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. dhananjay matade,narayangaon says

    यात सामान्य शेतक-यांच्या मुलानांही सहभाग मिळावा

Leave A Reply

Your email address will not be published.