Pune News : पुण्यात दारूगोळा कारखान्याच्या आवारात स्फोट; कंत्राटी कामगाराचा मृत्यू
Pune News : पुण्यातील अम्युनिशन फॅक्टरी खडकी आवारात एका संशयास्पद स्फोटक वस्तूचा स्फोट झाल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे.

Pune News : पुण्यातील अम्युनिशन फॅक्टरी खडकी आवारात एका संशयास्पद स्फोटक वस्तूचा स्फोट झाल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. कार्तिक बर्मन असे मृत कामगाराचे नाव असून तो या ठिकाणी काम करत होता. (Pune News)
कारखान्याच्या आवारात एका बांधकाम प्रकल्पाचा भाग म्हणून शौचालयाचे बांधकाम सुरू होते. दुपारी ३ च्या सुमारास, बर्मन बांधकाम ठिकाणाजवळ पाणी पिण्यासाठी गेला होता. तिथे प्लंबिंगचे साहित्य ठेवलेले होते. (Pune News)
तिथे पायरीवर बसलेला असताना एका संशयास्पद वस्तूशी चाळा करत असताना तिचा स्फोट झाल्याचा संशय आहे. या घटनेत तो जखमी झाला, असे खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम कदम यांनी सांगितले. (Pune News)
जखमी कामगाराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो कामगार नेमकी कोणत्या प्रकारची स्फोटक वस्तू हाताळत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा तपास सुरू आहे. (Pune News)





