बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता अमजद खान यांना आजही “शोले’ चित्रपटातील त्यांच्या प्रतिष्ठित गब्बर सिंहच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. अमजद खान यांनी 70 आणि 80च्या दशकात अनेक हिट चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या होत्या. यानंतर आता अमजद खान यांची मुलगी अहलम खान चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे.
अहलम खान ही खूपच स्टायलिश आणि सुंदर अशी अभिनेत्री आहे. ती मकरंद देशपांडे यांच्या “मिस सुंदरी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट देशपांडे यांच्या “मिस ब्यूटीफुल’ या नाटकावर आधारित आहे.
अहलम खान ही विवाहित असून तिने 2011मध्ये जफर कराचीवाला यांच्याशी विवाह केला होता. ती एक थिएटर आर्टिस्ट असून तिने अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केलेली आहे.
दरम्यान, अमजद खान यांना दोन मुले आहेत. यातील एक मुलगा शादाब खान याने चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचे चित्रपट फ्लॉप ठरल्याने त्याची कारर्किद लवकरच संपुष्टात आली. आता अहलम खानला मोठया पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.