मुंबई- बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे, कारण आजच्या तारखेला (2 ऑगस्ट) लाखो चाहत्यांच्या आशीर्वादाने बिग बींना आज नवीन आयुष्य लाभले. या खास दिवशी त्यांचा मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये बिग बी हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत, आणि उजव्या बाजूला अभिषेक बच्चन आणि डावीकडे श्वेता बच्चन बसले आहेत. तसेच, या फोटो खाली अभिषेकने भावनिक पोस्ट देखील लिहली आहे.
1982 मध्ये ‘कुली’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका मारामारीच्या सीनमध्ये अमिताभ यांचा एक मोठा अपघात झाला होता. आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अमिताभ यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, यावेळी त्यांची मृत्यूशी झुंज चालू होती.