विरुष्कावर अमिताभ यांनी घेतली चुटकी

बॉलीवूडमधील बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असतात. ते सतत चाहत्यांशी कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मावर एक जबरदस्त विनोद केला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा तो विनोद सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यासोबतच त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला असून, त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या रंगाची हूडी परिधान केलेली दिसत आहे. रंग हे अजून पण उतरले नाही आणि उत्साहाचे विनोद पण अजूनदेखील थांबले नाही. अनुष्का आणि विराट यांच्याबद्दल आदरपूर्वक…

असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. चिमुकली डान्समध्ये एवढी मग्न झाली आहे की, डान्स करताना चप्पल पायातून निघाली, तरी चिमुकली तिचा डान्स थांबवताना दिसत नाही. डान्स करताना चिमुकलीचे चेहऱ्यावरील हावभाव, कंबरेचे ठुमके आणि डान्स करण्याची ताकद पाहुन अमिताभ बच्चन यांनी तिचे कौतुक केले होते. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह असतात, अनेक प्रसंगी ते चाहत्यांना प्रोत्साहित करतानाही दिसतात. अमिताभ बच्चन त्यांच्या सर्व चाहत्यांच्या संपर्कात असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.