बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटासाठी जख्ख म्हाताऱ्याचा रोल केला आहे. त्यांच्या या रोलचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. टिपीकल लखनवी मुस्लिम वृद्ध व्यक्तीप्रमाणे त्यांचा हा गेटअप करण्यात आला आहे.
T 3215 –
– इस रूप को बनाने में ३ घंटे लगते हैं प्रतिदिन , और ऐसे हालात होते हैं , जहाँ ये बनाया जाता है pic.twitter.com/JoNTFFCkYn— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 4, 2019
लांब दाढी, डोक्यावर गोल टोपी आणि निळा कुर्ता घातलेला अमिताभ यांचा हा लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, अमिताभ यांनी चित्रपटातील लुक बद्दल आपल्या ट्विट अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. हा गेट अप करण्यासाठी तब्बल तीन तास लागतात असं त्यांनी म्हंटल आहे.
गुलाबो सिताबो चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा देखील मुख्य भूमिका साकारत आहे. हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून, चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना प्रथमच एकत्र येणार आहेत. सध्या लखनऊ मधील प्रसिद्ध महमूदाबाद हाउस मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. फिल्ममेकर शूजीत सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.