“गुलाबो सिताबो’मध्ये अमिताभ जख्ख म्हातारे

“गुलाबो सिताबो’मध्ये अमिताभ बच्चन यांनी जख्ख म्हाताऱ्याचा रोल केला आहे. त्यांच्या या रोलचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला. सुजित सरकारच्या या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पहिल्यांदाच आयुष्मान खुरानाबरोबर काम करत आहेत. गेल्याच आठवड्यात लखनौमध्ये त्यांनी आपल्या शुटिंगला सुरुवाते केली. टिपीकल लखनवी मुस्लिम वृद्ध व्यक्‍तीप्रमाणे त्यांचा गेटअप करण्यात आला आहे. लांब दाढी, डोक्‍यावर गोल टोपी आणि निळा कुर्ता घातलेल्या अमिताभ यांना ओळखणेही कठीण आहे.

त्यांनी डोक्‍याभोवती एक स्कार्फही गुंडाळला असून कपाळावर आठ्या पडलेल्या असल्यामुळे ते कोणत्या तरी गोष्टीवर नापसंती व्यक्‍त करत असल्यासारखे दिसते. लखनौमधील अतिशय जुन्या, पुरातन वास्तूच्या समोर ते बसलेले आहेत. “गुलाबो सिताबो’ची कथा जुही चतुर्वेदी यांनी लिहीली आहे. पुढच्या वर्षी 24 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगपूर्वी अमिताभ यांनी “चेहरे’साठी इमरान हाश्‍मीबरोबरचे काम पूर्ण केले आहे. आयुष्मान खुरानानेही आपल्या रोलची तयारी सुरू केली आहे. त्याचा “आर्टिकल 15′ लवकरच रिलीज होणार आहे. त्यात तो पोलिस अधिकाऱ्याचा रोल करतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.