‘गुलाबो सिताबो’साठी अमिताभ यांचा नवीन लूक पाहिलात का

लखनऊ : बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी आपल्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील आपला फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. यामध्ये बिग बी एका हटके लूक मध्ये दिसत येत आहे. यामध्ये त्यांनी कृत्रिम नाकाचा वापर केल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात अमिताभ यांची एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना दिसून येणार आहे.

गुलाबो सिताबो चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा देखील मुख्य भूमिका साकारत आहे. हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून, चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना प्रथमच एकत्र येणार आहेत. सध्या लखनऊ मधील प्रसिद्ध महमूदाबाद हाउस मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. फिल्ममेकर शूजीत सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.