मुंबई- बिग-बी अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड संक्रिय असतात. सध्या ते कोन बनेगा करोडपतीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. मात्र वयाच्या 77व्या वर्षी ते तब्बल 12 तास काम करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी केबीसीच्या रेकाॅर्डींगचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.
केबीसीच्या 12 तासांच्या शुटनंतर ते रेकाॅर्डीग करतानाचा फोटो आहे, बिना मेहनत किए जीवन में कुछ मिलता नहीं । बाबूजी कहते थे , “ जब तक जीवन है तब तक संघर्ष है, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
दरम्याक काही दिवसांपुर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉसिटीव्ह आली होती. त्यानंतर घरातील अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची कन्या आराद्या बच्चन यांच्या देखील चाचण्या पॉसिटिव्ह आल्या होत्या. मात्र बच्चन कुटुंबीयांनी कोरोनावर मात केली आणि पून्हा नव्या जोमात कामाला सुरुवात केली.