Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda | बॉलीवूडचे महानायक अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सिनेसृष्टीपासून दूर राहते. मात्र तरीही ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. नव्याने तिचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. तिने देशातील टॉपच्या इंस्टीट्यूटपैकी एक असलेल्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये अॅडिमशन घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. जे आता पूर्ण झाले आहे.
नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून नव्यानं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये तिचे अॅडिमशन झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फोटो शेअर करत नव्यानं कॅप्शन दिलं की ‘स्वप्न पूर्ण होतात.’ त्यासोबत नव्यानं सांगितलं की ती 2026 पर्यंत इथे तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. ‘ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएशन प्रोग्राम’ (BPGP MBA) असं कोर्सचं नाव असल्याचं तिनं सांगितलं आहे.
View this post on Instagram
नव्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कॉलेजच्या गेटवर उभी राहून IIM च्या नावासोबत पोज देताना दिसत आहे. त्याशिवाय तिनं कॉलेजमधील काही फोटो शेअर करत कॅम्पसची झलक शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनंतर कलाकारांसह चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:
करीना कपूरच्या भावाने गर्लफ्रेंड आलेखा आडवाणीला केले खास स्टाईलने प्रपोज