मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला 5 नोव्हेंबर म्हणजे आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या यश अपयशाचे अमिताभ बच्चन हे साक्षीदार आहेत. ‘कुली’ चित्रपटाच्यावेळी मृत्यूच्या दाढेतून बच्चन परत आले, त्यानंतर तब्येतीची अनेक दुखणी असतानाही ती बाजूला ठेवून आपले आयुष्य त्यांनी चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांच्या सेवेला झोकून दिले.
अनेक दुखणी डोकं वर काढत असताना त्याकडे दुर्लक्ष करत तितकाच हसत चेहरा ठेवत ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. ‘मी कोणीही मोठा व्यक्ती नाही, मी इथे नोकरी करतो’ असे सेटवर आलेल्या स्पर्धकाला सांगायला त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. 5 नोव्हेंबर 1969 रोजी बच्चन यांचा ‘सात हिंदुस्थानी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या पन्नास वर्षांत बच्चन यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अलीकडच्या काळातील ‘चिनीकम’, ‘निशब्द’, ‘पा’, ‘पिकू’, ‘पिंक’, ‘बदला’, ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’, मधल्या भूमिका या त्यांनी साकारलेल्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळ्या होत्या.
बच्चन यांच्या समकालीन अनेक अभिनेत्यांनी चित्रपटसृष्टींतून विश्रांती घेतली आहे, मात्र वयाच्या 77 व्या वर्षी बच्चन त्याच पूर्वीच्या उमेदीने झोकून काम करत आहेत. आगामी काळात त्यांचे ‘झुंड’, ‘गुलाबो सिताबो’, ‘ब्रह्मास्त्र’सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
Not just as a son, but as an actor and a fan… We are all blessed to witness greatness!
There is so much to admire, to learn and even more to appreciate. Several generations of cinema lovers get to say we lived in the times of BACHCHAN!!! pic.twitter.com/TQAJY3Hrfw— Abhishek Bachchan (@juniorbachchan) November 7, 2019
बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या बच्चन यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने देखील बच्चन यांच्यासाठी भाविनिक पोस्ट लिहिली आहे. ‘एक मुलगा म्हणूनच नाही तर अभिनेता आणि चाहता म्हणूनही तुमच्याकडे पाहताना अभिमान वाटतो. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे, समजून घेण्यासारखे आहे. चित्रपटप्रेमींच्या अनेक पिढ्या अभिमानाने सांगतील आम्ही बच्चन यांच्या काळात वाढलो. ‘ अशी पोस्ट अभिषेक बच्चन यांनी केली.