मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री त्यांच्या कुटुंबियांनी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी सांगितले की, त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. रात्री उशीरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कँसरशी त्यांची झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली आहे.
T 3517 – He’s GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
दरम्यान, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. ‘अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिले की, तो गेला, ऋषी कपूर गेले. आत्ताच त्यांचे निधन झाले आहे. मी नष्ट झालो आहे.’
महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. ‘अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिले की, तो गेला, ऋषी कपूर गेले. आत्ताच त्यांचे निधन झाले आहे. मी नष्ट झालो आहे.’