बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांच्या मराठी चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. तब्बल २५ वर्षांनी अमिताभ बच्चन हे मराठी सिनेमात दिसून येणार आहे. ‘ए बी आणि सी डी’ असं या सिनेमाचं नाव आहे. मिलिंद लेले हे या सिनेमाचे दिग्दर्शक असणार आहेत. येत्या २० मे (सोमवार) पासून सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, सलग पाच दिवस अमिताभ बच्चन या सिनेमाचं चित्रीकरण करणार आहे.
या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या बरोबर जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले सुध्दा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेमात विक्रम गोखले हे अमिताभ यांच्या जिवलग मित्राची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी ही दिग्गज जोडी ‘अग्निपथ’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी १९९४ मध्ये ‘अक्का’ नावाच्या मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका ससाकारली होती.