लॉकडाऊनमुळे सर्व देशवासियांना घरातच बसून रहावे लागल्याने आपल्या कल्पनाशक्तीची भरारी प्रत्येकजण मारायला लागला आहे. मनात आलेले विचार सोशल मिडीयावरून व्यक्त करायला लागला आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये अशीच एक भावनिक अपेक्षा व्यक्त केली आहे.
2020 हे सालच आपल्याला डिलीट करावेसे वाटते आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या वर्षामध्ये व्हायरस असल्याने 2020 हे वर्ष नव्याने “इन्स्टॉल’ करायला पाहिजे. त्यासाठी सध्या सुरू असलेले 2020 हे वर्ष डिलीट करायला पाहिजे, असे बच्चन यांनी म्हटले आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करावी.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. प्रवासी कामगारांच्या किमान गरजांची व्यवस्था करावी, असे आवाहन बच्चन यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून केले आहे. त्यांनी स्वतः देखील काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कामात योगदान दिल्याचे पूर्वीच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात 6 लाखांपेक्षा अधिक जण गंभीर आजारी पडले आहेत. तर 30 हजारांपेक्षा जास्ती जणांचा मृत्यू झाला आहे.