लंडन – विश्वचषक हा क्रिकेटचा आहे की पावसाचा असा प्रश्न येथील चाहत्यांना पडला आहे. आतापर्यंत चार सामने पावसाने धुतले असल्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. विश्वचषक स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर चाहत्यांनी समाज माध्यमाद्वारे चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
त्याचबरोबर आता भारतीय हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते बीग बी उर्फ अमिताभ बच्चन यांनी सुध्दा विश्वचषक स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर नाराज होत एक विनंती केली आहे. त्यांनी यासंबंधी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक मजेदार ट्विट देखील केले आहे.
इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा म्हणजे पावसाचेच सामने सुरू आहेत. आमच्या देशास विश्वचषकाबरोबरच पाऊसही पाहिजे. त्यामुळे आयसीसीने त्वरीत आमच्या देशात हे सामने घ्यावेत, असे सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
shift the tournament WC 2019 to India .. we need the rain .. !!! 🤣🤣🤣 https://t.co/KcGAAEODyr
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 13, 2019