मुंबई – बॉलिवूडमधील बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना आज नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली आहे. पुढील काही दिवस ते होम क्वारंटाईन राहणार आहेत.
तब्बल 23 दिवसांच्या उपचारानंतर अमिताभ बच्चन करोनामुक्त झाले आहे. 11 जुलै रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
अभिषेमने ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुदैवाने माझ्या वडिलांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरीच आराम करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार’.
दरम्यान अमिताभ बच्चन, आणि अभिषेक बच्चन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा सुद्धा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र ऐश्वर्या आणि आराध्या यांनी काही दिवसांपूर्वी करोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. अभिषेकही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्याच्यावर नानावटीमध्ये उपचार सुरू आहेत.