मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मागील वर्षी या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट बनून तयार झाला आहे. पण करोना संकटामुळे हा चित्रपट अडकला.
View this post on Instagram
या चित्रपटाचे डायरेक्शन नागराज मंजुळे यांनी केले असल्यामुळे चित्रपट कधी रिलीज होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘झुंड’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा होती. परंतु हा चित्रपट कुठं ही प्रदर्शित होणार नाही. असं स्वतः नागराज मंजुळे यांनी सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखती दरम्यान नागराज बोलत होते.
नक्की काय म्हणाले नागराज मंजुळे –
नागराज म्हणतात की.., आपण सर्वच जण ‘झुंड’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहात, कारण या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित करू असं स्पष्ट नागराज मंजुळे यांनी सांगितलं. तसेच, सद्या सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. हा चित्रपट थिअटरला रिलीज व्हावा अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे योग्यवेळी तो रिलीज करण्यात येईल. असं नागराज मंजुळे म्हणाले.
View this post on Instagram
नागराज मंजुळे यांनी चित्रपटसृष्टीला आता पर्यंत सैराट, नाळ, फँड्रीसारखे अनेक तगडे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता नागराजच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटालाही सैराटप्रमाणेच रसिकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ‘झुंड’ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘स्लम सॉकर’चे संस्थापक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. तसेच बच्चन एका प्राध्यापकाच्या भुमिकेत पाहायला मिळतील.