महानायक अमिताभ बच्चन म्हणाले, आपले लोक पोलिओप्रमाणे करोनालाही हद्दपार करतील

मुंबई – देशात सुरू असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमुळे भारत करोना मुक्त होईल, असा विश्‍वास मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी रविवारी व्यक्त केला.

या मोहिमेबाबत हा 78 वर्षीय अभिनेता म्हणाला, भारतातील लोक करोना पोलिओप्रमाणे हद्दपार करतील. पोलिओमुक्त भारत हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण होता. तेवढ्याच अभिमानाचा क्षण करोनामुक्त भारत हा असेल.

देश पोलिओमुक्‍त करण्यासाठी युनिसेफ राबवलेल्या गुलाबो सिताबो या प्रचार मोहिमेचा अमिताभ बच्चन हा प्रचारक होता. करोनाबाबत केंद्राने राबवलेल्या जनजागरण मोहिमेत अभिनयाचा हा शहनशहा सहभागी झाला होता. त्यांना स्वत:ला गेल्यावर्षी जुलैमध्ये करोना झाला होता.

त्यातून ते दोन आठवड्यात बरे झाले होते. या साथीबाबत ते सुरवातीपासून समाज माध्यामांतून ते सातत्याने लिहित होते. लहान मुलांचे लसीकरण आणि स्वच्छ भारत अभियान यांचाही प्रचारात हा दिग्गज अभिनेता सक्रिय असतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.